BusinessIndia

Bogus Degree   बनावट शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र तयार करणे आले अंगलट

 अरुण मोटघरे प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Bogus Degree   डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा/कोसरा, तालुका पवनी येथील प्राचार्य अरुण मोटघरे यांची माधवराव वानखेडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय कामठी येथे एमपीएड चे शिक्षण पूर्ण केल्याचे टी.सी. वर जन्मतारीख १० जुलै १९६७ आहे. तर याच महाविद्यालयाच्या दाखलखारीज रजिस्टर वर १० जुलै १९६४ आहे. Bogus Degree    यावरून प्राचार्य अरुण मोटघरे यांनी नोकरीत अतिरिक्त कालावधी व जास्तीचा आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने शाळा सोडण्याचे प्रमाणपत्रावरील जन्म तारखेत फेरफार केल्याचे सिद्ध झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पवनी यांचेकडून प्राचार्य अरुण मोटघरे यांचेवर फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.

नोकरीवर लागतेवेळेस स्वतः बनावट शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र केली तयार

Bogus Degree    स्वर्गीय श्री. लक्ष्मणजी मोटघारे चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर द्वारा संलग्नित डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा/कोसरा, तालुका पवनी येथे २००० पासून सुरू करण्यात आले असून २००८ पासून शासनाकडून अनुदान सुरू करण्यात आले आहे. ट्रस्ट चे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मोटघरे महाविद्यालय अनुदानावर आल्यापासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते सेवादल महिला महाविद्यालय उमरेड रोड येथे कार्यरत होते. नोकरीवर लागते वेळेस त्यांनी माधवराव वानखेडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय कामठी येथून एमपीएड चे शिक्षण पूर्ण केल्याचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र दिले. त्यावर १० जुलै १९६७ ही जन्मतारीख आहे तर त्याच महाविद्यालयाचे दाखलखारीज रजिस्टरवर जन्मतारीख १० जुलै १९६४ आहे. तसेच त्यांनी इयत्ता १ली ते नोकरी लागेपर्यंत संपूर्ण शाळा महाविद्यालयाच्या दाखलखारीज रजिस्टरवर त्यांची जन्मतारीख १० जुलै १९६४ हीच असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

अरुण मोटघरे यांनी नोकरीवर लागतेवेळेस स्वतः बनावट शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र तयार करून अतिरिक्त कालावधीत नोकरी करता यावी. तसेच जास्तीचा आर्थिक लाभ मिळावा. या करिता बनावट शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र तयार केल्याचे पुराव्यासह भाऊराव पंचवटे यांनी पोलिस ठाणे अड्याळ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर, संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकारी भंडारा यांनी तक्रारीची दखल घेऊन सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. त्यांनी दोनदा चौकशी केली असता Bogus Degree   अरुण मोटघरे जन्माचे ठोस पुरावे सादर करू शकले नाही. तरीही कारवाई होत नसल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ता भाऊराव पंचवटे यांनी आपला मोर्चा न्यायालयाकडे वळवून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पवनी येथे २०२१ ला कंप्लेंट केस दाखल केली. त्यावर नुकताच निकाल लागून शासनाची दिशाभूल व फसवणूक करून नोकरीसाठी अधिक कालावधी मिळावा तसेच जास्तीचा आर्थिक लाभ मिळण्याकरिता बनावट दस्ताऐवज तयार करून वापर केल्या प्रकरणी न्यायालयाने अरुण मोटघरे यांचेवर कलम ४२०, ४६८, ४७१ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात खडबड उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ता भाऊराव पंचवटे यांची न्यायालयात ऍड. सुरेश भांडारकर यांनी बाजू मांडली.

माहिती अधिकाराने फुटले बिंग 

Bogus Degree    प्राचार्य अरुण मोटघरे यांच्या जन्मतारखेबद्दल संशय आल्याने सामाजिक कार्यकर्ता भाऊराव पंचवटे यांनी अरुण मोटघरे यांनी ज्या शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्याची माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये दाखलखारीज रजिस्टर व शाळा सोडण्याचे प्रमाणपत्राची मागणी केली. दाखलखारीज रजिस्टर वरील जन्म तारखेची नोंद व नोकरी वर लागलेल्या टी.सी. तीळ जन्म तारखेच्या नोंदणीत तफावत दिसून आल्याने बिंग फुटले.

निलंबनावर उच्च न्यायालयाचा स्टे    

सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर यांनी चौकशी समितीचा अहवाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर  विद्यापीठाकडे पाठविला. विद्यापीठानेही चौकशी केली पण प्राचार्य अरुण मोटघरे यांनी कोणतेही जन्माचे ठोस पुरावे सादर केले नाही. त्यामुळे विद्यापीठाने त्यांना निलंबित केले. या विरोधात त्यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात पीटिशन दाखल करून स्टे घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button